राष्ट्रवादीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बाबा तारे
सोमवार, 23 जुलै 2018

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाग क्र .9 बाणेर-बालेवाडी-पाषाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला.
 

पुणे (औंध)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाग क्र .9 बाणेर-बालेवाडी-पाषाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला.

महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये हा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी, इयत्ता दहावीचे 630 तर इयत्ता बारावीचे 270 असे एकूण 900 विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी, कार्यक्रमाचे आयोजक व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले "चांगली शाळा-कॉलेज, चांगले शिक्षक, चांगले पालक त्याच बरोबर आपण राहणाऱ्या सभोवतालचा परिसर तेथे मिळणारी मूलभूत सुविधा आणि मुलांची इच्छाशक्त्ती या सर्वांचा योग जेव्हा जुळून येतो तेव्हाच चांगले विद्यार्थी घडतात, जसा आपला परिसर विकसित झाला तसेच आपण सर्व विद्यार्थांनी आपल्या कर्तृत्वाने, जिद्दीने शिक्षण क्षेत्रात नावलौकिक करून आपल्या या शाळा-कॉलेज, शिक्षक, पालक आणि आपल्या परिसराचे नावलौकिक करावे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, सरकार्यवाहक आस्वाद पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, उपाध्यक्ष अतुल बेनके, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पूजा चांदेरे, उद्योगपती साहेबराव कड इत्यादी मान्यवर आणि पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

Web Title: felicitation Honorable students from NCP