पुणे जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या बसल्या जिन्यातच कारण.....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका विरोधी पक्षातील इच्छुक सदस्यांना बसल्याचा आरोप ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केला आहे.

पुणे : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी काढण्यात आलेल्या अजेंड्यानुसार (कार्यक्रमपत्रिका) निश्चित करण्यात आलेले स्थळ ऐनवेळी बदलल्यामुळे विरोधी पक्षातील महिला सदस्य उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या. यामुळे वंचित राहिलेल्या सदस्यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप करत, निवड प्रक्रिया थांबली पाहिजे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. या मागणीसाठी महिला सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहाच्या बाहेर जिन्यात बसूनच धरणे आंदोलन केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका विरोधी पक्षातील इच्छुक सदस्यांना बसल्याचा आरोप ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केला आहे.

पुणे : झेडपी अध्यक्ष निवडणुकीवरून वाद

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या निवडणूक परिपत्रकानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार होती. यासाठी अर्ज भरण्याची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होती. यामुळे विरोधी पक्षातील इच्छुक सदस्या अर्ज भरण्यासाठी ११ वाजल्यापासून सभागृहाबाहेर जिन्यात बसल्या होत्या. मात्र ,एक वाजून गेल्यावरही सभागृहाचे दारही उघडण्यात आले नव्हते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा केली आणि प्रशासनाकडून पाचव्या मजल्यावर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. हे विरोधी सदस्यांना समजताच त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ई-मेल आणि फोन द्वारे तक्रार केली. विरोधी सदस्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा डाव असल्याच्या आरोप त्यांनी केला. या विरोधात न्यायालयात जाण्याच्या इशारा आशा बुचके यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female Members Protest against District Council President election