
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शहरातील आठ केंद्रांवर ८०० लाभार्थ्यांची निवड केली होती. त्यापैकी ४३८ जणांनी म्हणजेच ५५ टक्के लाभार्थ्यांनी पहिल्याच दिवशी लशीची पहिली मात्रा घेतली.
पुणे - जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी (ता.१६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्भोधनानंतर प्रारंभ झाला. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शहरातील आठ केंद्रांवर ८०० लाभार्थ्यांची निवड केली होती. त्यापैकी ४३८ जणांनी म्हणजेच ५५ टक्के लाभार्थ्यांनी पहिल्याच दिवशी लशीची पहिली मात्रा घेतली.
लसीकरण केंद्रावर ३२ नागरिकांनी येऊन लस घेण्यास नकार दिला. तर विशेष शहरात एकही लसीकरणासंबंधीची अप्रिय घटना घडली नाही. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कमला नेहरू रुग्णालयात लसीकरणाला सुरवात झाली. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यासह दोन्ही शहरात ३१ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दांना लस दिली जात आहे. पुणे शहरात ५५ हजार महापालिका कर्मचाऱ्यांनी नोंद केली असून, त्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी निवड केली आहे.
हे वाचा - CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ
अनुपस्थित लाभार्थ्यांचे पुढे काय?
लसीकरण केंद्रावरील ४२ टक्के लाभार्थी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अनुपस्थित होते. अशा लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी सध्या तरी कोणत्याच सूचना आल्या नसून, राज्याच्या आरोग्य खात्याकडून पुढील आदेश आल्यावर लसीकरण केले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.
लसीकरण दृष्टिक्षेपात
- लसीकरणाविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांत उत्साह
- लसीकरणानंतर प्रतिकूल परिस्थिती उद्भवली नाही
- सॉफ्टवेअरमध्ये सुरवातीला तांत्रिक अडचणी
- काही लाभार्थ्यांना मोबाईल संदेश मिळाले नाही
CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ
पुणे शहरातील केंद्रांवरील स्थिती -
लसीकरण केंद्र - 100 पैकी उपस्थित
1) जयाबाई नानासाहेब सुतार, कोथरूड - 47
2) कमला नेहरू रुग्णालय - 34
3) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा - 47
4) बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, ससून - 62
5) दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - 64
6) भारती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर - 54
7) नोबल हॉस्पिटल - 73
8) रूबी हॉल क्लिनिक - 57
पुण्यात मेल आयडी हॅक करून 5 कोटींची फसवणूक
अनुपस्थित लाभार्थ्यांच्या लसीकरणासंबंधी तूर्तास तरी कोणत्या सूचना नाही. संपूर्ण आढावा झाल्यानंतर राज्यस्तरावरून निर्णय घेतला जाईल. लाभार्थी अनुपस्थित का राहिले याचाही आढावा घेतला जाईल.
- डॉ. सचिन येडके, जिल्हा लसीकरण अधिकारी.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहिल्याच दिवशी शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोचणे शक्य होत नाही. पोलिओ लसीकरणाचा अनुभवही आपल्याकडे आहे. बहुतेक कर्मचारी कामावर होते. त्यांचे अनुपस्थित राहण्याचे कारण लगेच स्पष्ट होणार नाही. मात्र आम्ही त्याचा आढावा घेवू. तसे पाहिले तर लसीकरण समाधानकारक झाले आहे.
- डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक