Pune Crime News : वडा खाताना पाय लागल्याने पुण्यात टपरीवर हाणामारी; घरी जाऊन झोपलेला शिवम परत उठलाच नाही

Pune Street Fight : पुण्यात वडा खाताना पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून टपरीवर हाणामारी झाली. घरी गेल्यानंतर झोपलेल्या शिवमचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime News death

Pune Crime News death

esakal

Updated on: 

Pune Crime News Ganesh Peth : पुण्यात वडापाव घेताना पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भांडणात छातीवर मार लागल्यानंतर हा तरुण घरी जाऊन झोपला. मात्र, रात्री तो झोपेतून उठलाच नाही. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.

शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com