पुण्यातील नदीपात्राशेजारी मुलींचे दोन ग्रुप समोरासमोर भिडले अन्...

पुण्यातील नदीपात्राशेजारी मुलींचे दोन ग्रुप समोरासमोर भिडले अन्...
Updated on

पुणे : तुम्ही जर डेक्कनच्या नदीकाठी, "झेड ब्रीज'वर सायंकाळी फिरायला गेलात तर, तुम्हाला भरपुर जोडपी, मित्र-मैत्रीणींचे ग्रुप गप्पा मारत बसलेली दिसतात. पोरा-पोरींनी गप्पा मारत बसणे, तसे काही नवल नाही. असाच एक तरुणींचा ग्रुप काठोकाठ भरुन वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरील कट्ट्यावर गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी तेथे आलेल्या दुसऱ्या मुलींच्या ग्रुपने अचानक त्यांना चोपायला सुरूवात केली. ही "फ्रि स्टाईल' हाणामारी नेमकी कशामुळे, का या प्रश्‍नांची उत्तरे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मिळाली नाही, तसेच ते पोलिसांनाही कळले नाही. पण त्यांचा तो "फ्रि स्टाईल' हाणामारीचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे. 

तरुणांच्या दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मारहाणीच्या घटना झाल्याचे आपण नेहमीच पाहतो, ऐकतो किंवा त्याविषयीच्या बातम्या वाचतो. पण तरुण-तरुणींच्या गटांनी एकमेकांना मारहाण केल्याचे प्रकार तसे दुर्मिळच. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ही घटना कधी घडली, याविषयी कोणालाच काही माहिती नाही. पण ही घटना ओंकारेश्‍वर मंदिरामागील नदीपात्रातील कट्ट्यावर घडल्याचे व्हिडीओतुन दिसत आहे.

नेहमीच गर्दीने गजबजलेल्या या कट्ट्यांवर एका तरुणींचा ग्रुप गप्पा मारत होता. त्याचवेळी तेथे दुचाकीवरुन आणखी चार-पाच मुली आल्या. एकमेकींना हातवारे करीत, धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. काही क्षणातच त्यांचे मारहाणीत रुपांतर झाले. पाच-दहा तरुणी एकमेकींना लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम चोप देत होत्या. त्यामध्ये एक तरुण ती भांडणे सोडविण्यासाठी धडपडत होता. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्याने नागरीकाने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. 

मुळात भांडणे करणाऱ्या तरुणी कोण होत्या, ही भांडणे कधी झाली. त्यांच्या भांडणाचे कारण काय, या प्रकरणाचे पुढे काय झाले, या प्रश्‍नाची जशी सर्वसामान्यांना उत्तरे मिळू शकली नाहीत. तशीच ती पोलिसांनाही मिळाली नाहीत. नेहमीप्रमाणे पोलिस घटनास्थळी जाऊन आले, मात्र तोपर्यंत तिथे सामसुम होती. त्या आल्या, त्यांनी भांडणे केली आणि निघूनही गेल्या. पण त्यांचा "फ्रि स्टाईल' व्हिडीओ मात्र सोशल मिडीयावर बराच व्हायरल झाला आहे.  

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com