अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल; विशिष्ट धर्माला बदनाम केल्याचे आरोप!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

संबंधित कार्यक्रमातील चर्चेवेळी गोस्वामी यांची भाषा, हावभाव, देहबोली ही एका विशिष्ठ धर्माला आणि काही व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी असते. ​

पुणे : प्रक्षोभक भाषण, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक तणाव वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले डिबेट शो अशा विविध कारणांवरून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर केबल टेलिव्हीजन नेटवर्क (नियमन) कायदा 1995 चा वापर करुन ही तक्रार देण्यात आली आहे.

- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; परिस्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलाखा यांनी अॅड. असीम सरोदे यांचा कायदेविषयक सल्ला घेत अशा प्रकारची तक्रार दाखल केली आहे. गोस्वामी हे इंग्रजी आणि हिंदी रिपब्लिक टीव्हीचे संपादक आहेत. या वाहिन्यांवर वेगवेगळ्या विषयावरील डिबेट शो घेऊन गोस्वामी हे चुकीच्या कारणासाठी वारंवार चर्चेत राहतात.

- शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट; पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल

संबंधित कार्यक्रमातील चर्चेवेळी गोस्वामी यांची भाषा, हावभाव, देहबोली ही एका विशिष्ठ धर्माला आणि काही व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी असते. याच कारणावरुन त्यांच्यावर आक्षेप नोंदवून गोस्वामी यांच्याविरुद्ध अनेकदा फौजदारी तक्रारी दाखल झाल्या असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

- कोणाला नाही तर कोरोनाला सापडला दाऊद; कराचीत उपचार सुरू

दरम्यान,पहिल्यांदाच केबल टेलिव्हीज नेटवर्क (नियमन) कायदा 1995 च्या अंतर्गत तरतुदीचा वापर करुन ही तक्रार देण्यात आली आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारतची मालक कंपनी एआरजी आऊटलिअर मीडिया एशियानेट न्यूज प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध देखील तक्रार दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नवलाखा यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a complaint against Arnab Goswami with the Pune District Collector and Commissioner of Police