कोणाला नाही तर कोरोनाला सापडला दाऊद; कराचीत उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

पाकिस्तानात कराचीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच आता दाऊदलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे.

कराची, ता. 05 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर त्याचे गार्ड आणि इतर स्टाफलासुद्धा क्वारंटाइन करण्यात आल्याचं समजतं. दाऊदची पत्नी महजबीन देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दाऊद आणि त्याच्या पत्नीवर कराचीतील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानात कराचीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच आता दाऊदलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहीमला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानं त्यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्याच्या घरी काम करणारे कर्मचारी आणि गार्ड यांना क्वारंटाइन केलं असल्याचं समजतं. 

म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार

दाऊद पाकिस्तानात असल्याचं आतापर्यंत अनेकदा अमान्य केलं आहे. तसंच त्याच्या तब्येतीबाबतच्या अफवा याआधी अनेकदा पसरल्या होत्या. त्यामुळे आता कोरोनाची लागण झाल्याची अफवाही असू शकते. दाऊद बऱ्याच काळापासून त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानात लपून बसला आहे. भारताने अनेकदा पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानने हे नाकारलं आहे. 

जगभरातून आणखी ३८ विमाने मुंबईत येणार; आतापर्यंत 'एवढ्या' नागरिकांना केले 'एअरलिफ्ट!'

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. त्यानंतर इदनिमित्त लोकांना सूटही देण्यात आली होती. त्यानंतर पाकमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 89 हजार 249 रूग्ण आढळले आहेत. यातील 1838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 68 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी 4896 नवे रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याची ही सर्वात मोठी संख्या असल्याचं तिथल्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

विमानांना प्रवेशबाबत चीनचे एक पाऊल मागे; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर निकष बदलला

डॉन दाऊद इब्राहीम हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आहे. त्याच्याबाबत संपूर्ण जगाला माहिती आहे मात्र कुटुंबाबाबत कमी लोकांना माहिती आहे. दाऊदचे कुटुंबीय मात्र जगाच्या नजरेपासून दूर राहिलं आहे. दाऊदच्या पत्नीचं नाव महजबीन उर्फ जुबीना जरीन आहे. त्यांना चार मुलंही आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: underworld don dawood ibrahim and his wife tested corona positive says report