'सोशल डिस्टन्सिंग पाळा नाहीतर गुन्हे दाखल होतील'; चित्रपट निर्मात्यांना महामंडळाचा इशारा

The film corporation will file case against the producers for violating Social distancing Rules
The film corporation will file case against the producers for violating Social distancing Rules

पुणे : राज्य सरकारच्या‌ हातापाया पडून चित्रपट, मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी मिळविली आहे असे सांगताना, निर्माते नियम‌ांना हरताळ फासणार असतील आणि कलाकारांचे जीव जाणार असतील, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ‌ हे भरारी पथके नेमून संबंधित निर्मात्यांवर गुन्हे दाखल करील, अशी कठोर भूमिका महामंडळाने घेतली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे चित्रपट असो की मालिका यांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ ‌यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले. महामंडळ आणि कलाकारांनी सरकारकडे चित्रीकरण सुरू करण्यासाठी आग्रह धरला आणि सरकारनेही काही अटींवर ही परवानगी दिली होती. पण आता त्या अटींनाच आता हरताळ फासला जात आहे. त्यातून आशालता वाबगावकर या ज्येष्ठ अभिनेत्रीला कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा‌ मृत्यू झाला.

महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, "ज्येष्ठ कलाकारांना काम‌ करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने त्यांना अडविता‌ येणार नाही. पण कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यांनी शूटिंग आणि बाहेर पडणे टाळावे. थोडी अडचण होईल; पण त्याला पर्याय नाही. किमान महिनाभर काळजी  घ्यावी लागणार आहे. ज्येष्ठांना मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण अशा दुर्घटना घडत असतील, तर सरकार शूटिंगवर पुन्हा बंदी घालेल. त्यानंतर काहीच करता येणार नाही."

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

सरकारने कमाल 50 कलाकार, तंत्रज्ञांना खबरदारी घेऊन शूटिंगसाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी हातापाया पडून मिळाली आहे. परंतु अनेक निर्मात्यांनी नियमभंग करून चित्रीकरणाच्या स्थळी गर्दी वाढवत आहेत. त्यामुळे कोरोना संबंधी नियमांची अंमलबजावणी होते की नाही, कलाकार, तंत्रज्ञ यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे का, त्यांची भोजनाची व्यवस्था आणि अन्य गरजेच्या चांगल्या सुविधा त्यांना दिल्या जात आहेत का, हे तपासण्यासाठी महामंडळ भरारी पथके स्थापन करणार आहे. त्याद्वारे चित्रीकरणाच्या ठिकाणी अचानक जाऊन पाहणी केली जाईल. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असेल, तर स्थानिक पोलिसांच्या‌ मदतीने प्रॉडक्शन हाऊसवर गुन्हे दाखल केले जातील," असे राजेभोसले यांनी स्पष्ट केले.

शूटिंग बंदीला विरोध नसेल
कोरोनाचा प्रसार यापुढील काळात वाढत जाणार आहेत. सर्वच निर्मात्यांनी नियम पाळलेच पाहिजे, कलाकार प्रवास करणार असतील, तर त्यासंबंधी नियमांचे काटेकोर पालनही झाले पाहिजे. तसे पत्र आम्ही पाठविणार आहोत. कारण कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुण कलाकारांनाही आहे. चित्रीकरणापेक्षा कुणाचाही  जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे नियम पाळले नाही आणि सरकारने शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला, तर त्यास महामंडळ विरोध करणार नाही. कलाकार, निर्मात्यांना शिस्त लागेपर्यंत पुन्हा शूटिंग सुरू करण्यासाठी प्रयत्नही केले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.


कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

''निर्मात्यांनी कलाकार, तंत्रज्ञांच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. ते जमत नसेल, तर चित्रीकरण बंद होऊ शकते. ज्येष्ठ कलाकारांनी धोका पत्करून बाहेर पडू नये. त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कारण कोणत्याही कलाकाराची जीव हा महत्त्वाचा आहे.''
- मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, चित्रपट महामंडळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com