चित्रपट दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

ऍडमिनचे हक्क काढून घेत चित्रपट दिग्दर्शकाचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॅंकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ः ऍडमिनचे हक्क काढून घेत चित्रपट दिग्दर्शकाचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॅंकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

अक्षय संजय इंडीकर (वय 29, रा. आकाशवाणी कॉलनी, गणेशखिंड रस्ता, मॉडेल कॉलनी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंडीकर यांचा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अक्षय इंडीकर नावाने फेसबुकवर खाते आहे. त्याचा वापर ते व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी करीत. त्यांच्या अकाऊंडाला सहा पेज लिंक आहेत. ते हाताळण्याचे अधिकार फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडे आहेत.

23 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या पेज ऍडमिन ऍक्‍सेसच्या नोटीफिकेशनमध्ये माहिती आली की, त्यांच्या खात्यात महम्मद मुदासीर, महम्मद इलियास हे दोन अकाऊंड जोडले गेले आहेत. त्यामुळे फिर्यादी यांनी फेसबूक पेज पाहिले असता त्यांना ऍडमिन पदावरून हटविले असल्याचे समजले. त्याबरोबर त्यांच्या विविध सहा पेजवर देखील वेगवेगळे अज्ञात अकाऊंड ऍड झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या पेजवर अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक अनिल डफळ करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेसबुकसारखी माध्यमे किती सुरक्षित ः
इंडीकर यांच्या "त्रिज्या' आणि "स्थुलपुराण' चित्रपटांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अकाऊंड हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट केली आहे. अशाप्रकारे पेज हॅककरून चुकीची माहिती पसरविल्याने आम्हाला दुःख होत आहे. तसेच फेसबुकसारखी माध्यमे किती सुरक्षित आहेत यावरही इंडीकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझी बदनामी करण्यासाठी फेसबुक पेजचा गैरवापर होतो आहे. याबाबत मी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या सांगण्यावरून जास्तीत जास्त लोकांनी जर संबंधित प्रोफाइल रिपोर्ट केले तर फेसबुक तत्काळ कारवाई करेल. त्यामुळे संशयास्पद मॅसेजला प्रतिसाद देवू नका.-अक्षय इंडीकर, चित्रपट दिग्दर्शक

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film director Akshay Indikar's Facebook account hacked