अंतिम वर्षाच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे होणार डिसेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे २ हजार २०० विषयांचे प्रश्‍नसंच तयार करण्याचे काम या आठवड्याच्या शेवटी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अजून सुमारे ७०० विषयांचे प्रश्‍नसंच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे जमा झालेले नाहीत.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे २ हजार २०० विषयांचे प्रश्‍नसंच तयार करण्याचे काम या आठवड्याच्या शेवटी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अजून सुमारे ७०० विषयांचे प्रश्‍नसंच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे जमा झालेले नाहीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अंतिम पूर्व वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत आणि श्रेणीसुधारसाठी अर्ज करणाऱ्या अशा सुमारे पावणे तीन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने फक्त ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. 

सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांचीही घेण्यात आली असल्याने विद्यापीठाला आता २ हजार २०० पैकी ४० टक्के विषयांची पुन्हा नव्याने प्रश्‍नसंच काढण्याची गरज पडणार नाही. 

ज्या विषयांचे प्रश्‍नसंच काढण्याचे काम सुरू आहे, त्यामध्ये अचूकता असावी यासाठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या आठवड्याच्या शेवटी सर्व विषयांचे प्रश्‍नसंच जमा होणे अपेक्षित होते, परंतु सुमारे ६०० विषयांचे प्रश्‍नसंच जमा झाले आहेत. ते जमा झाल्यास ऑनलाइन परीक्षेच्या फॉरमॅटमध्ये आले आहेत का? त्याचा फॉन्ट किंवा इतर तांत्रिक समस्या निर्माण होतात का याची तपासणी करणे शक्‍य आहे. 

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

परीक्षा विभागाकडे शुक्रवारपर्यंत सुमारे ६०० विषयांचे प्रश्‍नसंच जमा झाले आहेत, अजून सुमारे ७०० विषयांचे प्रश्‍नसंच तयार झालेले नाहीत. पुढील आठवड्याच्या सुरवातीला प्रश्‍नसंचाचे काम पूर्ण होईल, असे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: final year examination held by Savitribai Phule Pune University in December