निगडीत तरूणांवर कोयत्याने वार करुन केली घरांची तोडफोड: चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

रविवारी (ता.2) फिर्यादी व त्यांचे मित्र माता रमाई इमारतीच्या बाजूला शेकोटी करून बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकी व रिक्षातून त्याठिकाणी आले.जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना कोयत्याने व हाताने मारहाण केली.

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणांवर कोयत्याने वार करुन परिसरातील घरांची तोडफोड करीत दहशत माजविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली. 

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

आदर्श अशोक मगर (रा. ओटास्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय शेंडगे, अनिकेत जाधव उर्फ अंड्या, तुषार झेंडे, महम्मद कोरबु (सर्व रा. अंकुश चौक, पत्राशेड, ओटास्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

रविवारी (ता.2) फिर्यादी व त्यांचे मित्र माता रमाई इमारतीच्या बाजूला शेकोटी करून बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकी व रिक्षातून त्याठिकाणी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना कोयत्याने व हाताने मारहाण केली. दरम्यान, आरोपी महम्मद याने फिर्यादीच्या मित्राच्या जर्किनच्या खिशातील दोन हजारांची रोकड शस्त्राचा धाक दाखवून हिसकावून नेली. तर तुषार झेंडे हा मोबाईल घेवून पसार झाला. यावेळी आरोपींनी परिसरातील घरांची तोडफोड करून दहशत माजविली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against four for attack by by Sharp weapons and vandalisation of house

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: