esakal | फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश

बोलून बातमी शोधा

फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश

पुण्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना अग्निशामक दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या! पुण्यातील रुग्णालयांना आदेश
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यातील कोवीड रुग्णालयांमध्ये अपघात होऊन रुग्णांचा हकनाक बळी जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना अग्निशामक दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व रुग्णालायांनी पुन्हा एकदा फायर सेफ्टी ऑडीट करून घ्यावे असे आदेश अग्निशामक दलाने दिले आहेत. शहरात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने जवळपास सर्वच रुग्णालयात कोरोना रुग्ण आहेत. ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. तर गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ३०० पेक्षा जास्त आहे. शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णालयातील आॅक्सिजन साठा, अग्निशामक यंत्रणा याकडे लक्ष ठेवणे अनिवार्य झाले आहे.

नायडू रुग्णालयामध्ये पहिले कोविड केअर सेंटर सुरू झाले. त्यानंतर तेव्हा अग्निशामक दलाने दुर्घटना रोखण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या. खासगी, शासकीय रुग्णालयातील अग्नी शामक यंत्रणेची पाहणी केली. तेथील अग्निप्रतिरोधक यंत्रणेसंदर्भातील सर्वेक्षण करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला. ऑडिट करताना त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात संबंधित कोविड रुग्णालयांना अग्निशामक दलाने पत्रही दिले आहे.त्याच अहवाल अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना देखील सादर करण्यात आला आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री

अपघाताची संभाव्य कारणे

- विद्युत उपकरणे २४ तास वापरात असतात

- सततच्या वापरामुळे त्यांच्यावर ताण घेऊ शकतो

- देखभालीकडे दुर्लक्ष केल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते

उन्हाळ्यामुळे उपकरणे गरम होऊन आग लागू शकते

अपघात टाळण्यासाठी काय करावे

- विद्युत उपकरणांच्या वायरची तपासणी करणे

- रुग्णालय व्यवस्थापनाने लक्ष द्यावे

- कोविड सेंटरमध्ये फायर एक्झिन्ग्यूशर सुस्थितीत आहेत का तपासावे

- उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे

हेही वाचा: बारामतीत कडक निर्बंध, तरीही कोरोनाची साखळी तुटेना

‘‘कोवीड रुग्णालयांच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट सुरु करावे. ज्यांच्या अग्निशामक यंत्रणा बंद असेल त्यांना नोटीस देऊन कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत.

प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल