तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

जिल्हा नियोजन बैठकीत देखील आमदार तापकीर यांनी 350वी पुण्यतिथी कार्यक्रम नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शीतल मालुसरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अभिनेते अजय देवगण, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पाहिजे. अशी मागणी केली होती.

खडकवासला : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची 350 पुण्यतिथी माघ वद्य नवमी या तिथीनुसार यंदा 17 फेब्रुवारीला आहे. सिंहगडावर 1670 मध्ये माघ वद्य अष्टमीच्या रात्री सिंहगडावर सुभेदार तानाजी मालुसरे व किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात लढाई झाली. यावेळी मालुसरे धारातीर्थी पडले. गडावरील त्यांच्या देह समाधीचा मागील वर्षी जीर्णोद्धार झाला आहे. 

‘कुमारी मातां’ची अघोरी कहाणी

यंदा नरवीर मालुसरे यांची 350 पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. पुरातत्व, वन, पर्यटन, ग्रामीण पोलिस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना या बैठकीला निमंत्रण करावे असे या पत्रात म्हटले आहे.

पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

दरम्यान, जिल्हा नियोजन बैठकीत देखील आमदार तापकीर यांनी 350वी पुण्यतिथी कार्यक्रम नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ.शीतल मालुसरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अभिनेते अजय देवगण, दिग्दर्शक ओम राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पाहिजे. अशी मागणी केली होती.

चीनमधील वुहान शहरातून येणारा प्रवासी विलगीकरण कक्षात

तापकीर यांनी सांगितले की, सिंहगडाशी संबधीत असणाऱ्या विभागांनी मिळून काम करण्याची गरज आहे. सिंहगडचा सर्वांगीण विकास आराखडा करण्याची गरज आहे. पालकमंत्री अजित पवार व खासदार व तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट सिंहगड घाट रस्ता तयार झाला. घाटात दरड प्रतिबंध जाळ्या बसविण्याचे काम सुरु आहे.

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Ajay Devgn come to Sinhagad on the death anniversary of Tanaji Malusare