हुश्श! सुटलो रे बाबा एकदाचा : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बस रवाना

The first bus of the students stuck in Pune was sent to the city
The first bus of the students stuck in Pune was sent to the city

पुणे :"गेले चाळीस दिवस पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची पहिली बस गुरूवारी दुपारी अहमदनगरच्या दिशेने स्वारगेटवरून रवाना झाली अन् तणावाखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. इतर शहरासाठीचेही नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'चा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी शहराच्या विविध भागात अडकून पडले. मेस, हाॅटेल, चहाच्या टपऱ्या बंद झाल्याने या विद्यार्थ्यांची उपासमार सुरू होती. अखेर विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांची जेवणाची सोय केली. मात्र २१ दिवसांचा लाॅकडाऊन संपल्यावर पुन्हा ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली गेले होते. विद्यार्थ्यांकडून गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑनलाईन नावनोंदणी करून २ हजार ३०० विद्यार्थ्यांची यादी प्रशासनाकडे दिली.  मात्र, सरकारकडून पुणे व मुंबईतून कोणालाही राज्याच्या इतर भागात जाता येणार नाही असे आदेश काढले. कोटा येथील विद्यार्थी महाराष्ट्रात परतल्याने व पुण्यातील विद्यार्थी गावाकडे जाऊ शकत नसल्याने याविरोधात टीकेची झोड उठली होती. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुण्यातील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा केल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनास तयारीचे आदेश दिले होते. 

खबरदार! कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराला विरोध कराल तर...! 

दोन दिवस झाले तरी प्रत्यक्षात गावाकडे जाण्यासाठी काहीच होत नसल्याने विद्यार्थी हतबल झाले होते. मनसेचे अमित ठाकरे यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी केली. त्यातच बुधवारी (ता.६) सायंकाळी नगर येथील काही विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी प्रशासनाकडून निरोप देण्यात आले. त्यानुसार आज (ता. ७) सकाळी १० वाजता १६ विद्यार्थ्यांना स्वारगेट बस स्थानकावर बोलविण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गावकडे गेल्यानंतर काय काळजी घ्यायची, क्वारंटाईन याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर १२ वाजता पहिली बस नगरच्या दिशेने रवाना झाली. 

पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात 'या' गोड बातमीने

"गेले काही दिवस आम्ही मानसिक तणावाखाली होतो, आज अखेर गावाकडे जाण्यासाठी निघाला असल्याने आनंद आहेच. गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आमच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या संघटनांचे आभार. प्रवासात आमच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली आहे "
-सुवर्णा उबाळे,  विद्यार्थीनी

प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुण्यात अशी सुरु राहणार दुकाने; वाचा सविस्तर बातमी 

"आमची आरोग्य तपासणी करून बसमध्ये बसविले आहे. बस देखील सॅनिटाईज केलेली आहे. आज घरी जायला मिळत आहे, पुण्यातून सुटका झाली याचा आनंद आहे."
-विक्रम नाबगे, विद्यार्थी

"बारामतीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट्स... 

"गावाकडे गेल्यानंतर स्वतःला क्वारंटाईन करून घेणार आहे. पुण्यात राहण्यापेक्षा गावाकडे घरात राहिलेले कधीही चांगले. आमची घरी जाण्याची व्यवस्था केल्याबद्दल प्रशासनाचे आभार."
- अजिंक्य शोश्रीय, विद्यार्थी

बांधकाम प्रकल्पांना तीन महिने मुदतवाढ;'महारेरा'चा निर्णय

"नगरसाठी दोन बसचे नियोजन होते, त्यापैकी पहिली बस १६ जणांना घेऊन रवाना झाली. पुढे नाशिक, जळगाव व नांदेड येथे बस पाठविण्यासाठी नियोजन सुरू आहे. अनेकचण ऐनवेळी प्रवास रद्द करत आहेत त्यामुळे नेमके किती जण जाणार हे स्पष्ट होत नाही. मात्र, यापुढे जसे विद्यार्थी, नागरिकांची यादी येईल तसे त्यांची आरोग्य तपासणी करून गावाकडे पाठविले जाईल. "
- तृप्ती कोलते पाटील, तहसिलदार, पुणे शहर

"पुण्यातील विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याचे विद्यार्थ्यांशी बोलून कळाले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशीही यावर चर्चा केली. त्यांनी त्वरीत कार्यवाहीचे अादेश दिले. पुण्यातून सर्व विद्यार्थी त्यांच्या आईवडीलांकडे जो पर्यंत जात नाहीत तो पर्यंत मदत केली जाईल, असे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com