esakal | अकरावीसाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती 'या' शाखेला; गुणवत्ता यादीतून समोर आली माहिती!
sakal

बोलून बातमी शोधा

FYJC_Students

अकरावी प्रवेशातील इनहाउस कोट्यातील प्रवेश संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केली होती.

अकरावीसाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती 'या' शाखेला; गुणवत्ता यादीतून समोर आली माहिती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पहिली पसंती दिली असून तब्बल ३४ हजार ०७१ विद्यार्थ्यांनी या शाखेसाठी नोंदणी केली आहे. तर विद्यार्थ्यांनी दुसरी पसंती वाणिज्य शाखेला दिली आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

यंदा दहावीच्या कल चाचणीत गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांचा कल हा कला आणि ललित कला शाखेकडे असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेला अनुक्रमे प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तात्पुरती गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची नोंदणी :

शाखा उपलब्ध जागा विद्यार्थ्यांची नोंदणी
कला १५,६८१ ६,७५२
वाणिज्य ४२,८१५ ३०,७३२
विज्ञान ४३,९८१ ३४,०७१
एचएसव्हीसी ४,४९५ १,२६५

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

"पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जातील भाग दोन भरण्यासाठी मंगळवारपर्यंतची (ता.२५) मुदतवाढ देण्यात आली आहे. तर कोटा प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी देखील बुधवारपर्यंतची मुदतवाढ दिली आहे," अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

अकरावी प्रवेशातील इनहाउस कोट्यातील प्रवेश संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केली होती. त्यासंदर्भात 'सकाळ'ने मागील आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर  शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top