esakal | Breaking : पुण्यातील आणखी एका तालुक्यात कोरोनाची एन्ट्री; पहिलाच रुग्ण अन् तोही पॉझिटिव्ह!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेले दहिटणे गाव राहू बेटात आहे.

Breaking : पुण्यातील आणखी एका तालुक्यात कोरोनाची एन्ट्री; पहिलाच रुग्ण अन् तोही पॉझिटिव्ह!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दौंड : महाराष्ट्रात कोरोना विषाणूची बाधा झालेला पहिला रूग्ण ९ मार्च रोजी पुणे येथे आढळून आला होता. त्यानंतर तब्बल ५१ दिवस उलटल्यानंतर दौंड तालुक्यातील दहिटणे येथे बुधवारी (ता.२९) कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. दहिटणे येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी आज या बाबत माहिती दिली. सदर ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला पुणे येथील ससून सर्वोपचार रूग्णालयात ४ ते ८ एप्रिल दरम्यान यकृताचा तीव्र त्रास होत असल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या मुलाचा मृत्यू झाला; त्यानंतर ज्येष्ठ नागरिकास २० एप्रिल रोजी त्रास होऊ लागल्याने प्रथम राहू (ता.दौंड) प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. घशाचा अधिक त्रास होत असल्याने सदर ज्येष्ठ नागरीकास २५ तारखेला पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल आज प्राप्त झाला असून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. 

- भिगवण : कोरोना रुग्नाच्या संपर्कातील 'त्या' २२ व्यक्तींची तपासणी; ३ किलोमीटरचा परिसर केला सील!

पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेले दहिटणे गाव राहू बेटात आहे. कोरोनाची बाधा झालेल्या या ज्येष्ठ नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यासह दहिटणे गावाच्या आठ किलोमीटर परिघातील गावांमध्ये अति खबरदारी घेत वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. रासगे यांनी दिली. 

- Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

दौंड तालुक्यात २० मार्चपासून लॅाकडाउन पाळला जात आहे. तालुक्यात आतापर्यंत १० हजार ३१७ नागरिकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी ९६८१ नागरिकांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. दौंड तालुक्याशेजारील बारामती, लोणी काळभोर, उरूळी कांचन आदी शेजारील तालुक्यांमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर २८ ते ३० एप्रिल दरम्यान दौंड शहरासह तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पुन्हा जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळला जात आहे.

- ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास

loading image