बारामतीत लोकसहभाग असलेले पहिले कोविड केअर सेंटर लवकरच होणार सुरु

The first Covid Care Center with public participation in Baramati will be started soon
The first Covid Care Center with public participation in Baramati will be started soon

बारामती : शहरातील लोकसहभाग असलेले पहिले कोविड केअर सेंटर लवकरच सुरु होत आहे. शहरातील इंदापूर रस्त्यावरील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह येथे शंभर खाटांच्या क्षमतेचे कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन प्रशासनाच्या मदतीने नटराज नाट्य कला मंडळ करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील लोकसहभागातून असे सेंटर सुरु करण्याचा हा पहिलाच प्रयोग असून प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे गुजर यांनी सांगितले. यात रुग्ण व्यवस्थापन, निवास, भोजन, चहा नाश्ता यासह डॉक्टर व परिचारिकांची सेवा, नियमित तपासणी, औषधोपचार अशी सर्व कामे नटराजच्या वतीने केली जाणार आहेत. 
रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर जेव्हा या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय डॉक्टर घेतील, तेव्हा संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेच्या मदतीने सेंटरमध्ये दाखल करण्यापासून ते 14 दिवस त्याला तेथे ठेवण्यासह त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे. 

उद्यापासून या बाबतचे काम सुरु होणार असून आवश्यकतेनुसार येथेही रुग्ण हलविले जाऊ शकतात. येथे रुग्णाच्या निवासासोबतच त्याच्या करमणूकी साठी टीव्ही हॉलचीही सुविधा दिली जाणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रयत्न नटराज नाट्य कला मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत. स्वागत कक्षापासून ते इतर सर्व प्रकारची जबाबदारी मंडळ स्विकारणार आहे.

भामा आसखेड आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा; मोठा संसर्ग होण्याची शक्यता 

प्रशासनाच्या मदतीला लोकसहभाग असेल तर या अडचणीच्या काळात त्यांचा ताण हलका होईल व रुग्णांवर उपचारासाठी त्यांना लक्ष केंद्रीत करता येईल, असे गुजर यांनी नमूद केले. सध्या रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध मनुष्यबळात काम करताना प्रशासनाची कसरत होत आहे, या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. 
पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

मिलिंद संगई, बारामती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com