शाळेच्या पहिल्या दिवसाबाबत पालक-पाल्यांसाठी महत्वाची बातमी

school.jpg
school.jpg
Updated on

पुणे : दरवर्षी १५ जुनला शाळा सुरु होणार म्हणजे होणारच. पण यंदा मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. गेल्या महिना- दिड महिन्यापासून शाळा सुरु कराव्यात की नाही, यावरुन विविध स्तरावर चर्चा होत आहेत. पण या सगळ्याला फाटा देत आता उद्यापासून शाळा सुरु होणार आहेत बरं का!! मात्र ही शाळा असेल "व्हर्च्युअल क्लासरूम"द्वारे भरणारी ऑनलाईन शाळा.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर म्हणाल्या, "दरवर्षीप्रमाणे यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जय्यत स्वागत करता येणार नाही. मात्र हे शिक्षण अखंड चालू राहावे, मुलांचा शैक्षणिक विकास कोरोनासारख्या महामारीच्या काळातही चालू रहावा. केवळ याच शुद्ध हेतूने "व्हर्च्युअल क्लासरूम"मार्फत आम्ही ऑनलाईन शाळा सोमवारपासूनच सुरू करणार आहोत. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेत मार्च महिन्यापासूनच शिक्षकांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे  ट्रेनिंग देण्यास सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेऊनच ऑनलाईन शाळेचे टाईमटेबल बनविण्यात आले आहे. पालकांची व्हर्च्युअल मिटिंग घेऊन त्यांनाही सर्व माहिती देण्यात आली आहे."

न्यू इंग्लिश स्कूलच्या (रमणबाग) मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी म्हणाल्या, "संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता सहावी ते नववीचे सर्व मुलांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करून दिले आहेत. संस्थेच्या टीम अॅपवर मुले लॉगिन होत आहेत. त्याद्वारे अभ्यासक्रम सूरू करण्याचे वेळापत्रक तयार आहे. मुलांचे लॉगिन पुर्ण झाले की नियमित तास सुरू होतील. पाचवीच्या मुलांच्या प्रवेशाची प्रकिया ऑनलाइन सुरू आहे. ते पूर्ण झाले की त्यांचेही तास सुरू होतील.'' 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करता येणार नसला, तरी तिच पहिल्या दिवसाची मज्जा विद्यार्थ्यांना घेता यावी, म्हणून शाळेच्या वतीने काही व्हिडीओ तयार केले आहेत. आजवर शाळेत साजरा केलेल्या पहिला दिवसाची आठवण करून देणारे हे व्हिडिओ आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. शाळेतील प्रार्थना आणि मुलांचे अशा पध्दतीने स्वागत होईल. हे व्हिडिओ सोमवारी शाळा भरण्याच्या वेळात पालकांच्या मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले जातील.-कल्पना वाघ, मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com