donald_20trump
donald_20trump

'आम्हाला 2 कोटी कोरोना डोस द्या, अन्यथा...'; आशियातील देशाने अमेरिकेला दिली धमकी

मनीला- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. आम्हाला कोरोनाची लस दिली नाही, तर आम्ही सैन्य करार रद्द करु, असं ते म्हणाले आहेत. अमेरिकेने आम्हाला लवकरात लवकर लस द्यावी, तसं न केल्यास व्हिजिटिंग फोर्सेस अॅग्रिमेट रद्द करण्याची आम्ही प्रक्रिया सुरु होईल, असं ते शनिवारी म्हणाले. 

अमेरिकेसोबतचा करार एकदम रद्द होण्याच्या मार्गावर आहे, अमेरिकेने कोरोना लशी पाठवण्यास मंजुरी न दिल्यास अमेरिकी सैन्याला त्यांचा देश सोडावा लागेल, असं दुतेर्ते म्हणाले. त्यांनी याआधीच अमेरिकेसोबत सैन्य करार रद्द करण्याचा आदेश दिला होता, पण नंतर 6 महिन्यांसाठी त्याला सस्पेंड करण्यात आलं होतं. या करारानुसार अमेरिकी सैन्य फिलीपीन्सच्या जमिनीवर सैन्य अभ्यास करु शकते. 

आजीच्या भेटीला जाण्यात चूक काय? राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरुन काँग्रेसचा...

अमेरिकेने आम्हाला कमीतकमी 2 कोटी कोरोनाचे डोस द्यावेत. त्यांनी असं न केल्यास त्यांच्यासाठी ते चांगलं राहणार नाही. अमेरिकी सैन्याला येथून हाकालले जाईल. लस नाही तर याठिकाणी थांबायचंही नाही, असं दुतेर्ते म्हणाले. दुतेर्ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वीही अमेरिके संबंधात भडखाऊ भाषणं केली आहेत. 

दुतेर्ते यांनी कोरोना मास्क धुण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना येडे ठरवलं होतं. दुतेर्ते यांनी याला प्रत्युत्तर देत, मी येडा असेल, तर तुम्हाला राष्ट्रपती व्हायला हवं होतं, मला नाही, असा टोला लगावला होता.

हट्टी ट्रम्प यांची 900 बिलियन डॉलरच्या बिलावर सही, नागरिकांचा चेक वटण्याचा...

दरम्यान, कोरोनाच्या जागतिक साथीवर मात करण्याच्या उद्देशाने जगातील अनेक देशामध्ये  लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जगभरात १७ लाख बळी घेतलेल्या आणि जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी केलेल्या कोविड-१९ विषाणूविरुद्ध  लशीचे अस्त्र परिणामकारक ठरण्याची आशा आहे. लंडनमध्ये सामूहिक लसीकरणाचा सुरुवात झाली आहे. यानंतरही २७ देशांचा युरोपीय महासंघ पुढील वर्षी जनजीवन काहीसे पूर्वपदावर येण्याचा सर्वोत्तम मार्ग लसीकरणाचा असेल असा प्रचार करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com