शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६७ गावांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी लाभार्थींच्या कर्ज खात्यात रक्‍कम जमा होईल. या प्रक्रियेतील तांत्रिक बाबी तपासून पाहण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थींना योजनेचा लाभ होईल. 
- अनिल कवडे, सहकार आयुक्‍त

पुणे - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्ह्यातील पहिली यादी सासवड आणि मोरगाव येथील जाहीर झाली असून, एक लाख ५१ हजार ८६३ खाती अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी निवडलेल्या दोन गावांतील कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक कुंभार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सासवड आणि मोरगाव येथे शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंदपावती कार्यक्रमाचा मंगळवारी (ता. २४) प्रारंभ झाला. विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सहायक निबंधक महेश गायकवाड, सहायक निबंधक हर्षिद तावरे या वेळी उपस्थित होते.

पुणेकरांना आता जंगलाचा राजा बघायला मिळणार 

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. निवडलेल्या दोन गावांतील पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. ही यादी बॅंक आणि ग्रामपंचायतीत प्रसिद्ध केली आहे. सासवड आणि मोरगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू असल्याचे कुंभार यांनी सांगितले. प्रल्हाद तुकाराम खोमणे, बाळासाहेब गेनबा बोरावके या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या जलद अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

पुरंदर विमानतळ ठरणार फायदेशीर; दर वर्षी येतील 'इतके' प्रवासी!

राज्यस्तरावर योजनेचा प्रारंभ
राज्यस्तरावर कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवनात झाला. यानिमित्त त्यांनी परभणी, नगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सहकार आयुक्‍त अनिल कवडे आणि अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First list of farmers debt relief scheme released in Pune district