रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'मोक्का'च्या गुन्ह्यात होते फरार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

बऱ्हाटे आणि इतर आरोपींवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पहिला गुन्हा दाखल झाला होता.

पुणे : खंडणी आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) नुसार कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर बऱ्हाटे हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

चायनीज मांजाविरोधात धडक कारवाई; पुण्यात दुकानदारांवर गुन्हे दाखल​

विशाल शिवाजी ढोरे (वय 36), अस्लम मंजूर पठाण (वय 24), सचिन गुलाब धिवार (वय 32), परवेझ शब्बीर जमादार (वय 39) आणि बालाजी विश्वनाथ लाखाडे (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या आरोपींबाबत विशेष सत्र न्यायालयाने पकड वॉरंट काढलेले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी बुधवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत दिली. उपायुक्त बच्चनसिंग हे अधिक तपास करीत आहेत.

बऱ्हाटे आणि इतर आरोपींवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. हडपसर पोलिस ठाण्यात देखील या आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये 13 जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यातील सातजण फरार झाले होते.

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला चौघेजण नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. तर एकाला हडपसर येथून पकडण्यात आले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस  ब-हाटेचा शोध घेत आहेत. त्याची मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five accomplices of Ravindra Barhate have been arrested by Pune Police Crime Branch