
कार-कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ल्याजवळील शिलाटणे येथे आज (रविवारी) सकाळी भरधाव कार व कंटेनर (Car Accident Lonavala) यांच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत हे मीरा भाईंदर येथील एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळत असून त्यांची नावे निष्पन्न होत आहे.
हेही वाचा: भडगाव फाट्यावर दुचाकीला अपघात; युवक जागीच ठार
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारच्या (एचआर २६ सीके ७८०५) चालकाचे कार्लाफाटा सोडल्यानंतर गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडत विरुद्ध बाजूने येणाऱ्या कंटेनरला (एमएच ४३ वाय ५१३०) धडकली. कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.
अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिस, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्त यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.
Web Title: Five Died In Car Accident At Lonavala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..