पुणेकरांनो, आता 5 रुपयांत करा 5 किलोमीटर प्रवास; पुणे- पिंपरींत बससेवेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाच रुपयांत प्रवाशांना बससेवा देणाऱ्या पीएमपीच्या या महत्वकांक्षी उपक्रमाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुणे महापालिकेजच्या आवारात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखविल्यावर बससेवेला प्रारंभ झाला.

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रवाशांना पाच रुपयांत, पाच किलोमीटर अंतरासाठी पाच मिनिटांत प्रवासाची सुविधा देणाऱ्या पीएमपीच्या बससेवेला शनिवारी प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखविल्यावर बससेवा सुरू झाली. राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयोग असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाच रुपयांत प्रवाशांना बससेवा देणाऱ्या पीएमपीच्या या महत्वकांक्षी उपक्रमाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुणे महापालिकेजच्या आवारात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखविल्यावर बससेवेला प्रारंभ झाला. पुणे शहराच्या मध्यभागातील 9 मार्गावर तर शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 36 मार्गांवर ही बससेवा दसऱ्यापासून म्हणजेच 25 ऑक्‍टोबरपासून पूर्ण क्षमतेने कार्यन्वित होणार आहे. त्यासाठी एकूण 180 मिडी बस असतील. शहराच्या मध्यभागात त्यातील 97 बस असतील. यामुळे शहराच्या मध्यभागात मिडीच बस धावतील, परिणामी त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल, असा पीएमपीचा होरा आहे. या प्रसंगी "पीएमपीएमएल केअर' या पीएमपीच्या ऍपचेही उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. बसचे वेळापत्रक, वारंवारिता आणि मार्ग आदींची माहिती त्यात असेल.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

या प्रसंगी पाटील म्हणाले, ""पीएमपीसारख्या नागरी सुविधा देणाऱ्या सेवा फायद्याच्या उद्देशाने चालविल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना तोटा होतो. तो भरून काढण्याची जबाबदारी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची आहे. त्यासाठी दोन्ही महापालिका खंबीरपणे पीएमपीच्या मागे उभ्या आहेत, ही कौतुकाची बाब आहे. शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी पीएमपीचा पाच रुपयांत पाच किलोमीटरचा उपक्रम मोलाचा आहे.''

या प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पुण्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पीएमपीचे संचालक शंकर पवार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे आदी उपस्थित होते. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

अखेर रवींद्र बऱ्हाटे फरारी म्हणून घोषित; बऱ्हाटेविषयी माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन​

या मार्गांवर प्रवाशांना मिळणार पाच रुपयांत बससेवा
- नरवीर तानाजी वाडी ते पुणे स्टेशन
- स्वारगेट ते शिवाजीनगर
- स्वारगेट- स्वारगेट : सारसगबाग, खजिना विहिर चौक, केसरीवाडा, अप्पा बळवंत चौक, लाल महाल, फडके हौद, कमला नेहरू हॉस्पिटल, 15 ऑगस्ट चौक, ससून, पुणे स्टेशन
- स्वारगेट- डेक्कन- शिवाजीनगर
- स्वारगेट- पुणे स्टेशन
- डेक्कन - पुलगेट
- डेक्कन - पुणे स्टेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five kilometer bus service starts at Pune-Pimpri for five rupees