पुणेकरांनो, काळजी घ्या! पुण्यात ७७ दिवसांत पाच हजार कोरोनाग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

शहरातील रुग्णवाढीचा हाच वेग कायम राहिल्यास, येथल्या १५ जूनपर्यंत हा आकडा साडेसहा हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज अखेरपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या पाच हजार ४९ झाली आहे. यामध्ये आज दिवसभरातील १९० नव्या रुग्णांचा समावेश आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णांनी सोमवारी (ता.२५) दुपारी चार वाजता पाच हजारांचा आकडा क्रॉस (ओलांडला) केला. गेल्या ७७ दिवसात फक्त शहरात (ग्रामीण, पिंपरी व नगरपालिका वगळता) एकूण पाच हजार ४९ रुग्ण नोंदले गेले आहेत. यानुसार पुणे शहरात दिवसाला  सरासरी ६५ नवे रुग्ण आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला होता. दरम्यान, आज अखेरपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या २५४ झाली आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येची सहा हजारांकडे सुरू झाली आहे. 

पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग  

शहरातील रुग्णवाढीचा हाच वेग कायम राहिल्यास, येथल्या १५ जूनपर्यंत हा आकडा साडेसहा हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज अखेरपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या पाच हजार ४९ झाली आहे. यामध्ये आज दिवसभरातील १९० नव्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण आकडा पाच हजार ८९९ वर गेला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड मधील ३५५ (आजच्या नव्या १० रुग्णांसह), ग्रामीण भागातील १७५ (नवीन तीनसह) आणि नगरपालिका व कटक मंडळांमधील  मिळून ३२० (नवे दोन) रुग्णांचा समावेश आहे.

- विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाचा घेतला 'हा' निर्णय

पुणे जिल्ह्यातील २७८ कोरोना रुग्णांचा ५५ दिवसांत बळी गेला आहे. शहरातील पहिला कोरोना बळी ३१ मार्चला गेला होता. एकूण बळींपैकी पुणे शहरातील २५४, पिंपरी चिंचवडमधील सात आणि जिल्हा ग्रामीण, नगरपालिका आणि कटक मंडळांमधील मिळून १७ जणांचा समावेश आहे.

- पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand corona victims registered in Pune in just 77 days