पुणे जिल्हा परिषदेकडून पाच हजार कामे पूर्ण - आयुष प्रसाद

पुणे जिल्हा परिषदेने वर्षभरात चार हजार कोटी रूपये मूल्य असलेल्या एकोणीस हजार विकासकामांना प्रशासकीय मान्यता देत कार्यारंभ आदेश दिले आहेत.
Aayush Prasad
Aayush PrasadSakal
Summary

पुणे जिल्हा परिषदेने वर्षभरात चार हजार कोटी रूपये मूल्य असलेल्या एकोणीस हजार विकासकामांना प्रशासकीय मान्यता देत कार्यारंभ आदेश दिले आहेत.

दौंड - पुणे जिल्हा परिषदेने (Pune ZP) वर्षभरात चार हजार कोटी रूपये मूल्य असलेल्या एकोणीस हजार विकासकामांना (Development Work) प्रशासकीय मान्यता देत कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यापैकी पाच हजार कामे पूर्ण झाली आहेत व त्या कामांचे लोकार्पण करण्याचा आनंद महत्वाचा आणि अभिमानास्पद आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी व्यक्त केले आहे.

Aayush Prasad
कुसेगाव-बिबटयाच्या हल्ल्यात पाच पाळीव प्राण्यांचा मृत्यू

लिंगाळी (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या निधीतील २.३८ कोटी रूपये मूल्य असलेल्या विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या बांधकाम तथा आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयुष प्रसाद बोलत होते. माजी आमदार रमेश थोरात अध्यक्षस्थानी होते.वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, हेमलता फडके, विकास कदम, सुनील जगदाळे, वैजयंता चितारे, आदी उपस्थित होते.

आयुष प्रसाद म्हणाले, 'जिल्ह्यात एका दिवसात २४६ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा विक्रम सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला. दर आठवड्याला १०० कोटी रूपयांची बिले काढली जात आहेत. जिल्ह्यात १६५ रूग्णवाहिका कार्यरत असून संपर्क केल्यानंतर अवघ्या १८ मिनिटात पोच होतील, अशा पध्दतीने कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com