
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या.
बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या मोटारसायकल चोरीच्या सत्रानंतर आज शहर पोलिसांनी दोन दुचाकीचोरांना अटक करुन त्यांच्याकडून पाच दुचाक्या जप्त केल्या. जवळपास 4 लाख 35 हजारांच्या या दुचाकी आहेत. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करा
चैतन्य पांडूरंग शेळके (वय 19 ) व किशोर सहदेव पवार (वय 19, रा. मोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोतीबाग चौक, इंदापूर रोड येथे नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान दोघे युवक बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडील बुलेट कसबा बारामती येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...
त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे व आष्टी (जि. बीड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याच्यी कबुली दिली. नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे, अनिल सातपुते, भगवान दुधे, दादासाहेब डोईफोडे, रुपेश साळुंके,सुहास लाटणे, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अकबर शेख, अजित राऊत आदींनी ही कामगिरी केली.
(संपादन : सागर डी. शेलार)