तब्बल 90 दिवसानंतर मार्केट यार्डातील फूल बाजार होणार सुरू पण...

flower1.jpg
flower1.jpg

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजार गुरुवार (ता. १८) पासून सुरू होणार आहे. तब्बल 90 दिवसांपासून हा बाजार बंद होता. या निर्णयामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सम-विषम पध्दतीने दररोज निम्म्या आडत्यांना करता येणार व्यवहार करता येणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्केट यार्डातील सर्वात आधी फुल बाजार 19 मार्चपासून बंद करण्यात आला होता. भाजीपाला, फळ, कांदा बटाटा विभाग सुरु झाल्यानंतर फुल बाजार सुरू करण्याची मागणी अडते आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर  बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात अडते आणि बाजार बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत बाजार सुरू करण्याच्या निर्णय झाला. बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, फुलबाजार अडते आणि अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड, उपाध्यक्ष हरिभाऊ कामठे, सागर भोसले, अंकुश शेलार, राजू मोहिते, नाना जगताप, किरण जगताप उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात गर्दी न करता विविध उपाययोजना करून बाजार सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी बाजाराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. येथे केवळ घाऊक विक्री होणार असून, किरकोळ विक्रीला परवानगी नाही. बाधित क्षेत्रातील लोकांना प्रवेश दिला जाणार नसून, मास्कशिवाय बाजारात प्रवेश मिळणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com