Coronavirus : दूध उत्पादकांसमोर ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

fodder issue for milk farmers due to Lockdown News in Marathi
fodder issue for milk farmers due to Lockdown News in Marathi

करंजगाव (पुणे) : मावळात शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी पशुपालन करतात. मात्र, अशात दूध उत्पादकांसमोर ओल्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ऊसतोडणी हंगाम संपला असून लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे, अशात आता वैरणही महागली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाल्यापासून नाणे मावळात शेती व पशुपालन व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. जास्त उत्पन्न मिळवून देणारे व वाढयाच्या स्वरूपात वैरण उपलब्ध करून देणारे पीक म्हणून ऊसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. जोपर्यंत ऊसतोडणीचा हंगाम चालू असतो तोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भावात वाढयाची कुट्टी उपलब्ध होत असते. ऊसतोडणीचा हंगाम संपल्यावर मात्र शेतकऱ्यांची वैरणीकरीता चांगलीच दमछाक होते. पशुपालनाचा जोडधंदाच आता वैरणीच्या कमतरतेमुळे पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे.त्यात लॉकडाऊनमुळे बाहेरून चारा आणण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. ओल्या चाऱ्याच्या टंचाईमुळे व महागाईमुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाऱ्याचे भाव गगनाला
ऊसतोड हंगाम संपल्याने शेतकऱ्यांपुढे चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकूटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे. कुट्टीसाठी येणाऱ्या ऊसाचा भाव साडेतीन हजार रुपये प्रति टन झाला आहे. परिणामी किरकोळ कुट्टीसाठीचे भाव आणखीनच वाढले आहे.

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

ऊसाशिवाय दूध उत्पादकांसाठी कडब्याची कुट्टी आधार ठरत असते, परंतु, यावर्षी कडबा कुट्टीसाठीही जास्त भाव मोजावा लागत आहे. हा दर आता १५ ते २० रुपये प्रति किलो झाला आहे. मका ०३ रुपये किलो आहे.

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा

गरज हायड्रोपॉनिक्स चारा उत्पादन करण्याची
बाजरी, मका यासारख्या पिकांचे बियाणे ट्रेमध्ये ८ ते १० दिवसांपर्यंत वाढविले जाते. असे ट्रे पीव्हीसी पाईप, बांबू अथवा लोखंडी पोलच्या आधारे कमी जागेत एकापेक्षा अधिक थर असलेल्या सांगाड्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था असते. त्यावर शेडनेटसारखे आच्छादन असल्याने तीव्र उन्हापासून संरक्षण मिळते. तसेच, या ट्रेला दिवसातून आवश्यकतेनुसार ४ ते ६ वेळा पाण्याचा फवारा मारून अपेक्षित आर्द्रता राखण्यात येते.या पद्धतीत बियाणे आधी पाण्यात भिजवून, गोणपाटात भिजवून ठेवले जात असल्याने त्याची उगवण चांगली होते. या बियाण्यात साठवलेल्या अन्त्रांशाच्या सहाय्याने पाण्याचा वापर करून हिरव्या चा-याची वाढ ८ ते १o दिवसांत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com