esakal | वनविभागाचे सॅटलाइट चोरीला; जुन्नरमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वनविभागाचे सॅटेलाइट चोरीला; जुन्नरमधील प्रकार

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील धनगरवाडी व सावरगाव येथे वन्य प्राण्यांच्या अभ्यासासाठी बसवण्यात आलेले तीन सॅटॅलाइट नियंत्रित कॅमेरे आज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असून एक कॅमेरा फोडला आहे. या बाबत जुन्नर वनविभागाच्या वतीने नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. अशी माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

या बाबत वनपाल काळे म्हणाले जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वतीने बिबट्या तसेच अन्य वन्य प्राणी यांच्या हालचाली व येण्याजाण्याच्या वेळा टिपण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या मध्य भागात ५ एप्रिल २०२१ रोजी शंभर सॅटॅलाइट नियंत्रित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.हे कॅमेरे लोखंडी बॉक्समध्ये संरक्षित करून पाणवठे व वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भागातील झाडांवर बसवले आहेत. या पैकी धनगरवाडी येथील दोन व सावरगाव येथील एक असे तीन कॅमेरे लोखंडी बॉक्स फोडून चोरून नेले असून सावरगाव येथील एक कॅमेरा फोडला आहे.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

चोरीचा घटना ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या दरम्यान घडली आहे. या कॅमेराव्दारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तालुक्यातील बिबट व अन्य वन्य प्राण्यांचा अभ्यास करण्याचे नियोजन आहे.वन्य प्राण्यांच्या संशोधनाचा लाभ तालुक्यातील जनतेला होणार आहे.हे कॅमेरे सॅटॅलाइट नियंत्रित असल्याने ते बंद अवस्थेत असताना देखील त्या ठिकाणाहून कुठे कुठे गेले याची माहिती नियंत्रण कक्षाकडून तपासा अंती मिळू शकते.उत्सुकतेपोटी हे कॅमेरे कोणी घेऊन गेले असल्यास कारवाई टाळण्यासाठी वन्य विभागाकडे तातडीने जमा करावेत. किंवा ९८६०३८८९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा. संबधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. -ऋचा घाणेकर (संशोधक : राष्ट्रीय वन्यजीव संस्था)

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

loading image