Forest Minister Ganesh Naik to visit Pimparkhed
संजय बारहाते
टाकळी हाजी : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे अलीकडेच झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे, भागुबाई थोरात आणि रोहन बोंबे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर वन खात्याच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला होता. संतप्त नागरिकांनी पिंपरखेड येथे रास्ता रोको आंदोलन करत वनमंत्री गावात आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा दिला होता.