बावधनमध्ये साकारण्यात येतयं वनउद्यान; 'ही' आहेत उद्यानाची वैशिष्ट्ये

जितेंद्र मैड
मंगळवार, 7 जुलै 2020

वनविभागाच्या चार हेक्‍टर जमिनीत वन उद्यान साकारण्यात येत आहे.

कोथरूड (पुणे) : वनविभागाच्या वतीने बावधन येथे वन उद्यान साकारण्यात येत आहे. येथे आज(ता. 7) सोळाशे झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली. यावेळी भांबुर्डा वनविहारात जेव्हा आम्ही प्रवेश फी आकारणे सुरू केली. तेव्हा लोकांनी त्याला विरोध केला. ऑक्‍सिजनचे सुद्धा पैसे घेणार का असा प्रश्‍न आम्हाला विचारण्यात आला. परंतु, लोकांना ऑक्‍सिजनची किंमत कळाली, तरच वृक्षसंपदेचे, पर्यावरणाचे जतन करणे शक्‍य आहे, असे मत उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी यांनी व्यक्त केले.'' 

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

""वनविभागाच्या चार हेक्‍टर जमिनीत वन उद्यान साकारण्यात येत आहे. उद्यानातील आठशे मीटरची पायवाट, पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी तयार केलेले बांध, तळे, झाडे या मुळे हा परिसर बावधनचा मानबिंदू ठरेल असेही उपवनसंरक्षक लक्ष्मी यांनी सांगितले.'' महानगरपालिकेच्या वतीने येथे विविध विकास कामे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नगरसेवक दिलीप वेडेपाटीलयांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

या प्रसंगी मुख्यवनसंरक्षक विवेक खांडेकर, सहायक उपवनसंरक्षक वैभव भालेराव, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही.कापसे, किरण दगडेपाटील, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, गणेश वरपे आदी उपस्थित होते. 

वनउद्यानाची वैशिष्ट्ये.. 
1.ओपनजीम, पॅगोडा साकारणार 
2. पाऊलवाट 
3. मुलांसाठी पर्यावरण शिक्षण केंद्र 
4.वीस प्रजातीची सोळाशे झाडे 
5. दोन वर्षानंतर खुले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A forest park is being set up in Bawadhan