pune mayor bungalow
sakal
पुणे - महापौर बंगल्याचे नामकरण ‘रामदूत’ करावे असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे. त्यास महापौर संघटनेने विरोध केला असताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. शासकीय बंगल्याला नाव दिले जाते. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे नाव देण्यास काहीच चुकीचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.