Vidhan Sabha 2019 : मावळात भाजपमध्ये बंडाळी; भाजपचा इच्छूक राष्ट्रवादीकडून

ज्ञानेश्‍वर बिजले 
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपमधील इच्छुक सुनील शेळके यांनाच भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर उभे केले. त्यामुळे, अनपेक्षितपणे ही लढत लक्षवेधी व चुरशीची ठरली आहे. 

Vidhan Sabha 2019 : अखेर चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला

शेळके गेली दोन वर्षे निवडणुकीची तयारी करीत आहेत. तसेच भेगडे यांच्याविरुद्ध पक्षातील एक गट गेले काही दिवस सक्रीय झाला आहे. शेळके आता राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने भाजपच्या पारंपरिक मतात फूट पडणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची परंपरागत मतांमध्ये शेळके यांच्यामुळे मिळणाऱ्या मतांची भर पडल्याने, मावळचा गड राखण्यासाठी भेगडेला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

Vidhan Sabha 2019 : वर्चस्व टिकविण्याची मुळीक-टिंगरेची वडगाव शेरीत लढाई ! 

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने ठिकठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते पक्षात घेत त्यांच्यासाह्याने सत्ता मिळविली. तोच पॅटर्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळ मतदारसंघात वापरला. भाजपचा अन्य एक इच्छुकही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने, दोन वेळा निवडून आलेल्या बाळा भेगडे यांना तिसऱ्यांना निवडून येण्यासाठी यंदा मोठे श्रम करावे लागणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former bjp leader Sunil Shelke elects from NCP in Maval for Vidhansabha 2019