शुटींगदरम्यानचा हिट सीन; राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला भाजपच्या माजी आमदाराची हजेरी

Former BJP MLA attends Raj Thackeray program in Pune
Former BJP MLA attends Raj Thackeray program in Pune

कात्रज (ता. २०) : महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (ता. २०) पुण्यातील कात्रज भागातील मांगडेवाडीत सुरु एका चित्रपटाच्या शुटिंगच्या मूहूर्तासाठी हजर होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार योगेश टिळेकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले असले तरी या चित्रपटाच्या शुटींगच्या मुहूर्तावेळी भागातील सर्वच पक्षाचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित असल्याने टिळेकरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.


ठाकरे यांच्या हस्ते '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देण्यात आला. उत्तम स्टारकास्ट आणि महत्त्वाचा विषय असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देऊन चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. 'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त होणं आनंददायी आहे. आता पुढील काही दिवसांत पुणे आणि परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येईल,'असं दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितलं.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेनं या पूर्वी राजकीय आणि प्रेमकथा असलेल्या कागर या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर सुश्रुत भागवत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असे एकदा व्हावे असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटाची निर्मिती विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत.

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​

चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com