Holi Video : मॉर्निंग वॉकला गेलेल्या माजी मंत्री दत्तामामा भरणेंना मित्रांनी रंगवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Datta Bharane

Holi Video : मॉर्निंग वॉकला गेलेल्या माजी मंत्री दत्तामामा भरणेंना मित्रांनी रंगवलं

पुणे : धुलीवंदनानिमित्ताने पुण्यात चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात झाली असताना पुण्यातील तळजाई टेकडी वर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या मित्रांनी रंगवलं आहे.

दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे नेते असून ते ठाकरे सरकारच्या काळात मंत्री होते. ते इंदापूर मतदारसंघातील आमदार असून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत ते जिंकले होते. त्यांनी आज सकाळी मॉर्निंक वॉकला गेले असताना मित्रांसोबत होळी खेळण्याचा आनंद घेतला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी अनेकजण मोठ्या प्रमाणावर रंग खेळत असतात. तर काही संस्था किंवा हॉटेलवर पार्टीचे आयोजन केले असते. या दिवशी डीजे लावून डान्स केला जातो. तरूणाईंकडून या दिवशी मोठ्ठी धमाल केली जाते.