पुणे हादरलं! माजी सरपंचाचा अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेवून बलात्कार; पोलिसांनी रंगेहात पकडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Crime News

पुणे हादरलं! माजी सरपंचाचा अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेवून बलात्कार; पोलिसांनी रंगेहात पकडलं

पुणे - मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नझिरकर हे पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ अस सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: गायी-म्हशी पाळा, रामदेव बाबांच्या नकली तुपाने कसे तंदुरुस्त राहणार; BJP खासदाराचं विधान

पीडित मुलीने बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Pune NewsPune Crime News