
Ex MLA Prakash Deole Dies After Brief Illness Last Rites Today
Esakal
पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकाश देवळे यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.