बारामतीत क्रिकेट सामना हरल्याच्या रागातून चौघांकडून युवकाला मारहाण

बारामतीत क्रिकेट सामना हरल्याच्या रागातून चौघांकडून युवकाला मारहाण

बारामती : कधी कोणाला कशाचा राग येईल आणि त्या रागातून काय कृत्य हातून घडेल याचा नेम नसतो, त्यातही तरुण रक्त असेल तर तो राग अधिकच तीव्रतेने उफाळून येतो. रागाच्या भरात अनेकदा आपण काय करतो हेही समजत नसल्याने पोलिस कारवाईपर्यंत वेळ येऊन ठेपते. बारामतीतही असाच किस्सा घडला. 

क्रिकेट खेळताना हार जीत तर सुरुच असते पण सामना हरल्याच्या कारणावरुन विरोधी संघातील चौघांनी एकाला जबर मारहाण करण्याची घटना शहरातील तांदूळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

ओम गणेश वायसे (रा. गुनवडी, ता. बारामती) याने या संदर्भात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शहरातील खंडोबानगर येथील सचिन काळे, नितीन काळे, निखिल कुंभार, अमर काळे (पूर्ण नावे माहिती नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीत सामना जिंकल्यानंतर ओम वायसे हा त्याचे मित्र पप्पू शिंदे, सूरज करे यांच्यासह तांदूळवाडीतील शरदनगर येथून घरी निघाले होते. त्याचे वेळेस सामना हरल्याचा राग मनात धरुन सचिन काळे, नितीन काळे, निखिल कुंभार, अमर काळे या चौघांनी त्यांना गाडी आडवी मारत सामना हरल्याच्या कारणावरुन लाकडी दांडक्याने बँटने पाठ व मानेवर मारहाण केली. शिवीगाळ करत पुन्हा मारण्याचीही धमकी दिली. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडवली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com