
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शेळगाव गावाच्या हद्दीमध्ये बारामतीकडे दुचाकीवरुन चाललेल्या दुचाकीला जोराची धडक देवून गाडीला फरफटत नेले.
वालचंदनगर : शेळगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये इंदापूर-बारामती राज्यमार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकीने दोन दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातामध्ये चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
- विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक
अपघातामध्ये मयूर चव्हाण, सौरभ काळे व वैभव काटकर (रा. सणसर) व आनंद राम देवाशी (मूळ रा. राजस्थान) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. १९) रोजी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बारामतीहून इंदापूरच्या बाजूकडे एम.एच.१२ ईटी ९४९३ ही चारचाकी गाडी वेगाने चालली होती.
- धुमशान ग्रामपंचायतीचं : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार बेनके
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शेळगाव गावाच्या हद्दीमध्ये बारामतीकडे दुचाकीवरुन चाललेल्या दुचाकीला जोराची धडक देवून गाडीला फरफटत नेले. तसेच तसेच रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी उभा असलेल्या दुचाकीस्वारला धडक दिली. अपघातानंतर चालक पळून गेला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
- रोगानं नाही डॉक्टरनंच केला घात; कॅन्सरच्या नावाखाली उकळले दीड कोटी!
राज्यमंत्र्यांच्या मुलाने दिला जखमींना मदतीचा हात-
अपघात झाल्यानंतर अर्धा तासानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे विवाहसोहळा उरकून घराकडे चालले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कुणीही मदत करण्यास तयार नव्हते. मात्र भरणे व अंबादास लांडगे यांनी तातडीने जखमींना उचलून स्वत:ची चारचाकी गाडी ठेवले. व उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठविल्यामुळे जखमींना वेळेमध्ये उपचार मिळण्यास मदत झाली.
(संपादन : सागर डी. शेलार)