बाप रे! पुणे जिल्ह्यात एका दिवसात 88 जणांचा मृत्यू; पावणेपाच हजार नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १७४, नगरपालिका क्षेत्रात ३३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४१ नवे रुग्ण सापडले आहे. 

पुणे  : पुणे जिल्ह्यात आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी पावणेपाच हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ९३८ जणांचा समावेश आहे. दरम्यान, आज ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रुग्णांचा एक हजारांचा आकडाही आज  सलग तिसऱ्या दिवशी क्रॉस झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढू लागल्या स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १७४, नगरपालिका क्षेत्रात ३३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४१ नवे रुग्ण सापडले आहे. 

दरम्यान, आज  मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३७  रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २४ , जिल्हा परिषद क्षेत्रातील २२, नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोघा जणांचा समावेश आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १०) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

बारामतीत कोरोनासाठी ॲक्टिव्ह सर्व्हे ; तीन गावांच्या सीमा करण्यात येणार सील

दरम्यान, आज दिवसभरात ४ हजार ५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ५७३, पिंपरी चिंचवडमधील १ हजार २७२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ४५२, नगरपालिका क्षेत्रातील १४१ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ८८ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७० हजार ८०० झाली आहे. याशिवाय आतापर्यंत  ४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १६५ जण आहेत.

कोरोनानं काय वेळ आणली; बेरोजगार झालेला तरुण बनला चोरटा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four thousand seven hundred fifty new corona patients in Pune district