आरारा ! आमदारांसोबत कोरोनाची रॅपिड टेस्ट 'त्या' चौघांनी केली अन्...

corona.jpg
corona.jpg

पुणे : पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी रॅपिड टेस्ट सुरू झाल्या आहेत. अशाच एका टेस्ट सेंटरच्या चाचण्यांना पुण्यातील एका आमदारांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. कोरोना काळात रोजचा ठेवावा लागणारा जनसंपर्क पाहाता खबरदारी म्हणून आमदारांनी स्वतः आणि सोबत आलेल्या कार्यकर्त्यांची या नव्या यंत्रणेद्वारे यावेळी चाचणी करून घेतली. त्यानंतर अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल आला खरा. मात्र, तो पाहून सगळ्यांचेच धाबे दणाणले. कारण चाचणी केलेल्या कार्यकर्त्यांपैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सुदैवाने आमदारांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे या आमदारांचा जीव भांड्यात पडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील कोविड केअर सेंटर आणि स्वॅब कलेक्शन सेंटर येथे या रॅपिड टेस्ट सूरू झाल्या आहेत. त्यासाठी पुणे महानगपालिकेने आरसीएमआरची मान्यता असलेल्या कंपनीकडून एक लाख किट खरेदी केल्या आहेत. पुण्यातील कोरोना रूग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार करता आले तर कोरोनाला प्रतिबंध करण्यासोबत मृत्यूदरही कमी करता येऊ शकतो असा उद्देश या जलद चाचण्यांचा आहे. अशाच एका कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड टेस्टचे कीट उपलब्ध झाले. याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कळवली. आमदारांच्या उपस्थितीत रॅपिड टेस्टला सुरूवात करण्याचे ठरले. आमदार महोदय सदर केंद्रावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या चारचाकींमधून सात आठ कार्यकर्तेही दाखल झाले. लॅब टेक्निशियन यांनी किट कसे काम करते, किती वेळात अहवाल प्राप्त होतो याची माहिती उपस्थितांना दिली. रोज अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या भेटी, जनसंपर्क यामुळे आमदारांनी स्वतःहून स्वतःची पहिली चाचणी करून घेण्याचे ठरवले. त्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांनाही आमदारांनी चाचणीचा आग्रह केला.

आम्ही फीट आहोत. आम्हाला काहीही त्रास नाही, असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदारांच्या आग्रहामुळे चाचणी करावी लागली. त्यानंतर अर्ध्या तासात अहवाल आला. त्यात चाचणी केलेल्या सहा कार्यकर्त्यांपैकी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सुदैवाने आमदारांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. त्यानंतर सदर कार्यकर्त्यांवर उपचारासाठी पुढील कार्यवाही करण्यात आली. तसेच त्यांच्या घरच्या मंडळींना त्याची कल्पना देऊन घरच्यांचीही चाचणी करण्यात आली. कोरोनाची लक्षणे काही व्यक्तींमध्ये दिसून येत नाहीत. अशा व्यक्ती वाहक असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसल्यास किंवा कोरोना रूग्णाशी संपर्क आल्यास न घाबरता तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन सदर आमदारांनी केले आहे.        

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com