
पुणे ः मुसळधार पाऊस नाही, की जोरदार वादळ-वारा. असे असतानाही रस्त्याच्याकडेला असणारे मजबुत झाडाची फांदी क्षणार्धात कोसळली आणि नेहमीप्रमाणे त्या झाडाखाली गप्पा मारणाऱ्या महिला फांदीखाली आल्या. चार ते पाच महिलांना "त्या' एका फांदीने जखमी केले. त्यापैकी तिघींना गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरूवारी सायंकाळी दांडेकर पुल परिसरात घडली.
दांडेकर पुल परिसरातील एसपीएम शाळेजवळच्या आंबीलओढा वसाहतीमध्ये एक झाड आहे. वस्तीमधील महिला दुपारी, सायंकाळी या झाडाखाली गप्पा मारतात. लहान मुले झाडाभोवती खेळतात. नेहमीप्रमाणे गुरूवारी सायंकाळी देखील शारदा थोरात, सुरेखा आरडे, लक्ष्मी कसबे, सारिका शिंदे, पार्वती सोनवणे या महिला झाडाखाली गप्पा मारत बसल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता झाडाची फांदी अचानक महिलांच्या अंगावर कोसळली. या घटनेने महिला घाबरल्या. प्रसंगावधान राखत स्थानिक नागरीकांनी फांदीचे काही भाग बाजुला काढून चार महिलांना तत्काळ बाहेर काढून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र फांदीचा मोठा भाग अंगावर पडल्याने एका महिलेला बाहेर काढण्यात नागरीकांना अडचण येत होते. त्याचवेळी नागरीकांनी जनता वसाहत अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान उमेश शिंदे, विठ्ठल साबळे, महेश गारगोटे, सचिन क्षीरसागर यांनी फांदीखाली अडकलेल्या महिलेची काही मिनीटांमध्येच सुटका केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
झाडाची फांदी पडून त्याखाली महिला अडकल्याची खबर आम्हाला मिळताच आम्ही तेथे पोचलो. नागरीकांनी अन्य महिलांना बाहेर काढले. तर आम्ही मोठी फांदी कापून काढत एका महिलेची सुटका केली. दोघीजणी किरकोळ, तर तीन महिला गंभीर जखमी आहेत.-फायरमन, जनता वसाहत अग्निशामक केंद्र
झाडाच्या फांद्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या घटना
* 10 जुलै 2019 - घोले रस्ता - झाडाची फांदी कोसळून जयश्री जगताप या दिव्यांग महिलेचा मृत्यु
* 2 ऑगस्ट 2019 - येरवडा - शनिआळी परिसरात झाडाची फांदी कोसळून सलीम शेख यांचा मृत्यु
* टिळक रस्ता - स.प.महाविद्यालय चौक - पीएमपीच्या ब्रेकडाऊन व्हॅनवर झाड कोसळल्याने चालकाचा मृत्यू
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.