वनप्लस डिस्ट्रीब्यूशनचे काम देतो सांगून तरुणाची तब्बल 23 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

हडपसर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात त्यांना अनोळखी व्यक्तींनी ईमेल व फोनद्वारे संपर्क साधला. आपण वनप्लस मोबाईल कंपनीमधून बोलत असल्याचे सौरभ भट व दिव्या चतुर्वेदी अशी खोटे नाव असणाऱ्यांनी फिर्यादीस सांगितले.

पुणे : वनप्लस मोबाईल कंपनीच्या मोबाईलचे वितरण व्यवस्थेचे काम देण्याच्या बहाना करुन दोघांनी एका तरुणाची तब्बल 23 लाख 67 हजाराची फसवणूक केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

हडपसर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात त्यांना अनोळखी व्यक्तींनी ईमेल व फोनद्वारे संपर्क साधला. आपण वनप्लस मोबाईल कंपनीमधून बोलत असल्याचे सौरभ भट व दिव्या चतुर्वेदी अशी खोटे नाव असणाऱ्यांनी फिर्यादीस सांगितले. त्यानंतर त्यांनी वनप्लस मोबाईल कंपनीची वितरण व्यवस्थेचे काम द्यायचे आहे, असे सांगून फिर्यादीशी ओळख वाढविली.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?

फिर्यादीशी मैत्री करून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर मोबाईल कंपनीच्या वितरण व्यवस्थेचे काम मिळण्यासाठी फिर्यादीस वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 23 लाख 67 हजार रुपयांची रक्कम वेळोवेळी भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे काम देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी फिर्यादीस प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यासही त्यांनी नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस करीत आहेत.

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud 23 lakh 67 thousand Of boy for OnePlus distribution in Pune