Pune Fraud : परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक; दोघांना अटक

परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
fraud
fraud sakal

पुणे - परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमाननगर परिसरातील ‘माय कॉलेज खोज’ संस्थेच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

अमित कुमार (वय ३८, रा. मगरपट्टा सिटी), प्रतिभा भाटी (वय ३४, रा. मगरपट्टा सिटी), सौरभ मनोज झा (वय २६, रा. खराडी) आणि पूनम चंदनसिंग राजपूत (वय २५, रा. रामवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी झा आणि राजपूत यांना अटक केली असून, अन्य दोघे आरोपी पसार झाले आहेत.

या प्रकरणी एका तरुणीने (रा. अंबरनाथ, जि. ठाणे) विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी उच्च शिक्षणासाठी इटलीला जाणार होती. तिने विमाननगर परिसरातील ‘माय कॉलेज खोज’च्या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली. इटलीतील शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि व्हिसा मिळवून देण्यासाठी आरोपींनी तिच्याकडून दोन लाख सहा हजार रुपये घेतले.

तसेच, बनावट बॅंक स्टेटमेंट तयार करून तरुणीला सरकारी कार्यालयात कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. परंतु प्रवेश न मिळाल्याने तिने विचारणा केली. तेव्हा संस्थेतील संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तरुणीने चौकशी असता इतर चार-पाच विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com