esakal | बक्षिसाचे आमिष दाखवून केली सव्वा लाखाची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

ऑनलाईन माध्यमाद्वारे बक्षिस देण्यात आले असल्याची बतावणी करुन एका महिलेच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीने सव्वा लाख रुपये लंपास केले.

बक्षिसाचे आमिष दाखवून केली सव्वा लाखाची फसवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ऑनलाईन माध्यमाद्वारे बक्षिस देण्यात आले असल्याची बतावणी करुन एका महिलेच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीने सव्वा लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

खराडी येथे राहणाऱ्या एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्याान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेस दहा दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तिने फोन केला. महिला वापरत असलेल्या गुगल पे अ‍ॅपमध्ये लवकरच बक्षिसाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे आमिष तिला दाखविण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादी महिलेस एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तिने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख 23 हजार रुपये लांबविले.

  Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

आपली फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश पासलकर तपास करत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून विविध कारणे दाखवित नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

loading image
go to top