आर्थिक फसवणूक करणारे पुण्यात जेरबंद

बाबा तारे
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे : नागरिकांकडून दैनिक, मासिक, वार्षिक व लहान मुलांसाठी मुदत ठेवी ठेवून जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणा-या संचालकांना चतुःश्रूंगी पोलिसांनी ओरिसा राज्यातून अटक केली आहे.

ओरिसा राज्यातील प्रवेशचंद्र रामचंद्र राऊत, मुन्ना महादेव पात्रो, किर्ती रंजन निरंजन बस्तिया या तिघांनी ऑस्कर मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड, ऑस्कर को. ऑपरेटीव्ह सोसायटी व ऑस्कर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाने कंपन्या स्थापन करुन महाराष्ट्रासह गुजरात, ओरिसा राज्यात आर्थिक व्यवहार सुरु केले.

ठेवीच्या वेगवेगळ्या अकरा प्रकारच्या योजना राबवून काही काळ नागरीकांचा विश्वास संपादन करत ठेवी परतही केल्या; परंतु 2013 नंतर कंपनी बंद करुन जमा केलेल्या ठेवी परत न करताच परस्पर 84,23,990 रुपये एवढी रक्कम घेऊन पोबारा केला.याविषयीच्या तक्रारी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला व आरोपींना ओरिसा राज्यात जाऊन तपासपथकाने ताब्यात घेतले.

यातील संशयित आरोपी 1)प्रवेशचंद्र रामचंद्र राऊत (53 वर्षे रा.औपाड पोलीस स्टेशन,पत्तमुंदई जि.केंद्रापाडा, ओरिसा),2) मुन्ना महादेव पात्रो(वय 44वर्षे,रा.बेलागुंठा,ब्लॉक रोड,पोलीस स्टेशन भंजानगर जि.गंज्जम ,ओरिसा),3) किर्ती रंजन निरंजन बस्तिया (वय 49वर्षे,रा.एन.5,298आयआरसी व्हिलेज,पोलिस स्टेशन नायापल्ली,जि.खुर्दा ,ओरिसा) यांना ओरिसा राज्यातील कटक येथून अटक करण्यात आली.शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता तीन मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या ऑस्कर कंपनीच्या नावे गुजरातसह महाड, बीरवाडी, ब्रम्हपूर, भुवनेश्वर येथे पन्नास कोटीची मालमत्ता आहे. लोकांना फसवून व त्यांच्या रकमा घेऊन अशा प्रकारे पोबारा करणा-या या कंपनीच्या संचालकांविरुध्द कोणाची तक्रार असेल किंवा या कंपनीत पैसे गुंतवले असतील अशा नागरीकांनी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: fraudsters arrested in Pune