esakal | रहाटणी येथे गरजू रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा

बोलून बातमी शोधा

रहाटणी येथे गरजू रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा
रहाटणी येथे गरजू रुग्णांना मोफत डायलेसिस सुविधा
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : कोरोना महाभयंकर संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर डायलेसिसची गरज असणाऱ्या रूग्णांना मदतीचा हात देण्यासाठी बालेवाडी पुणे येथील अडवाणी-फेरवानी केअर फाउडेशन मदतीसाठी धावून आले आहे. त्यांनी शिवराज नगर रहाटणी पिंपरी येथे चार डायलेसिस मशिन मोफत गरजू व गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अजून सात डायलेसिस मशिन येथे लवकरच कार्यरत करण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा: पुणे परिसरात गारांच्या पावसाच्या हजेरीने आंबा बागायतदार काळजीत

सोन्या-चांदीचे व्यापारी रांका ज्वेलर्सचे संचालक फतेचंद रांका यांच्या हस्ते डायलेसिस सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक नाना काटे, अडवाणी-फेरवानी केअर फाउडेशनचे संचालक मनोहर फेरवानी, संचालक घनश्याम सुखवानी, संचालक सुनील अडवाणी, संचालक संजय मीरचंदानी उपस्थित होते. सोमवार ते शनिवार या कालावधीत दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत रुग्णांना डायलेसीस सेवा दिली जाणार आहे. गरजू रुग्णांनी रॉयल मायस्टिक २८/2 ब शिवराजनगर, रहाटणी पिंपरी-पुणे येथे मोबाईल क्रमांक ९९७००४३००५ / ९९७००४३००६ किंवा मेल आयडी :contact@anpcarefoundation.org येथे नाव नोंदणी करावी. असे आवाहन संचालक मनोहर फेरवानी यांनी केले आहे.

कोविड मुळे अनेक ठिकाणी डायलेसीस सुविधेवर परिणाम झाला होता. सदर रूग्णांना तत्परतेने सेवा मिळावी म्हणून सेवा केंद्र सुरु केले आहे. पिंपरी – चिंचवड प्रमाणेच आंबेगाव व खेड तालुक्यातील गरज असलेल्या रूग्णांना प्राधान्याने डायलेसीस सुविधा मिळणार आहे. येथील डायलेसीस केंद्रात तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत उपचार सुविधा दिली जाते. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.-जवाहर कोटवानी अडवाणी–संचालक, फेरवानी केअर फाउडेशन

हेही वाचा: पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर