esakal | अवसरी खुर्दमध्ये कोरोनावर होमिओपॅथीची मोफत सेवा; गृहमंत्र्यांचं आवाहन यशस्वी

बोलून बातमी शोधा

homiopathy corona treatment

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  "आयुष" संवर्गातून होमिओपॅथिक डॉक्टरांनी आंबेगाव तालुक्यात कोव्हीड उपचार केंद्रात रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन केले होते

अवसरी खुर्दमध्ये कोरोनावर होमिओपॅथीची मोफत सेवा; गृहमंत्र्यांचं आवाहन यशस्वी
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी डॉक्टरांचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  "आयुष" संवर्गातून होमिओपॅथिक डॉक्टरांनी आंबेगाव तालुक्यात कोव्हीड उपचार केंद्रात रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत. अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या कोव्हिड उपचार केंद्रात वीस होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने दररोज २४ तास विनामुल्य सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण व नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कामाचे कौतुक केले. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसोदिवस वाढत चालली आहे. परंतु उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता भासत असल्यामुळे रुग्णांना विविध संमस्याना तोंड द्यावे लागत होते. प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली होती.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

डॉक्टरांबरोबर प्रथम शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी चर्चा केली. वळसे पाटील यांनी केलेल्या आव्हानाची माहिती डॉक्टरांना दिली. सोमवारी (ता.१२) होमिओपॅथिक डॉक्टरांनी काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांचा सन्मान  शाल, श्रीफळ देवुन शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबादास देवमाने, "नॅशनल इंटिग्रेटेड होमिओपॅथिक मेडिकल प्रॅक्टिशनरस असोसिएशनचे" सेक्रेटरी डॉ. प्रताप वळसे पाटील, डॉ.सुहास कहडणे, डॉ.नवनाथ वर्पे, डॉ.संजय घाडगे उपस्थित होते. अडचणीच्या काळात डॉक्टरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मार्च २०२० मध्ये कोव्हीड १९ संदर्भात सर्व राज्यांना कोविड केअर सेंटर (CCC) व डेजीकनेटेड कोविड हॉस्पिटल (DCHC) मध्ये वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्धता होण्यासाठी "आयुष" वैद्यकीय व्यावसायिकांच्या नेमणुका करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत  इतर सर्व राज्यांत "आयुष" संवर्गातून होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्रात आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभागाच्या वतीने सर्व उपविभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधून "आयुष" संवर्गातून होमिओपॅथिक डॉक्टरांना वगळण्यात आलेले आहे. पण आमच्यापेक्षा कमी शिक्षण असलेले. वार्ड बॉय, परिचारिका यांची भारती केली आहे. राज्यात ४० हजार होमिओपॅथी डॉक्टर आहेत. कोव्हीड उपचारासाठी त्यांची तयारी आहे. शासनाने याबाबत युद्ध पातळीवर निर्णय घेवून कार्यवाही केल्यास कोव्हीडचे महाभयंकर संकट रोखण्यात होमिओपॅथीक डॉक्टरांचे योगदान महत्वाचे ठरेल.” - डॉ. प्रताप वळसे पाटील, सेक्रेटरी, नॅशनल इंटिग्रेटेड होमिओपॅथिक मेडिकल प्रॅक्टिशनरस असोसिएशन