पुण्यातील तरुण-तरुणींनी कसा केला 'फ्रेंडशिप डे' साजरा? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

'फ्रेंडशिप डे'च नाही, तर व्हॅलेन्टाईन डे, न्यू इअर अशा विविध दिवसांना साजरा करण्यासाठी शहरातील फर्ग्युसन रस्ता, कॅम्प, जे.एम.रस्ता अशा ठिकाणी नेहमीच युवकांची गर्दी असते. ​

पुणे : 'फ्रेंडशिप डे' निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील कट्टे, कॅफे सारख्या ठिकाणी युवकांची होणारी गर्दी, हातात रंगेबेरंगी 'फ्रेंडशिप बँड', मैत्रीचे ग्रीटिंग कार्ड, अंगठ्या, चॉकलेट अशा वेगवेगळ्या गोष्टी देत आपापल्या मित्र मैत्रिणींसोबत उत्साहात साजरा होणारा हा 'मैत्री दिन' यंदा सुना सुना सेलिब्रेट झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा 'फ्रेंडशिप डे' ऑनलाईन आणि सोशल मीडियावरच साजरा झाला.

यंदा 'रक्षाबंधन' होणार ऑनलाईन; कोरोनाने बदलल्या सणांच्या प्रथा!

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच सर्व महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबूकसारख्या समाज माध्यमातून शुभेच्छा देत सर्वांनी हा दिवस साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर एरवी आपापल्या मित्र मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड, चॉकलेट किंवा गिफ्ट घेण्यासाठी दुकानात होणारी गर्दीसुद्धा यावर्षी कमी होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातूनच हा दिवस मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सऍपवर तसेच इतर समाज माध्यमांवर संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. 

Breaking : ससून रुग्णालयात 'इतके' ऑक्‍सिजन बेडस्‌ उपलब्ध होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती​

"ये दूरी तो फिलहाल है, 'तेरी मेरी यारी तो रहेगी सौ साल है", असे संदेश देत तर काहींनी सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री दर्शविणारे चित्र आणि मास्क घालून मैत्री दिनाच्या शुभेच्छा असणाऱ्या चित्रातून आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मैत्री हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचं नातं म्हणून ओळखलं जातं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आपल्या आयुष्यातील या खास नात्यासाठी तशा व्यक्तींची निवड स्वतः करतात. रक्तातील नसलं तरीसुद्धा विश्वासावर टाकणाऱ्या या मैत्रीच्या बांधनाला जपण्यासाठी दरवर्षी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 

'एसटी'च्या पाया पडणाऱ्या कंडक्टरचा फोटो व्हायरल; काय आहे यामागचे कारण?

रस्त्यावर नाही तर व्हिडिओ कॉलवर भेटूया : 
'फ्रेंडशिप डे'च नाही, तर व्हॅलेन्टाईन डे, न्यू इअर अशा विविध दिवसांना साजरा करण्यासाठी शहरातील फर्ग्युसन रस्ता, कॅम्प, जे.एम.रस्ता अशा ठिकाणी नेहमीच युवकांची गर्दी असते. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे शांतता होती. तर बाहेर भेटून मैत्री दिवस साजरा करण्याऐवजी व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर दुकानातही खरेदीसाठी आलेल्या लोकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day celebrated online and on social media this year Due to the covid 19