esakal | खडकवासल्यातील फरार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासल्यातील फरार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

खडकवासल्यातील फरार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : गंभीर गुन्हे दाखल आणि २०१९ पासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केलं आहे. (Fugitive criminals from Khadakwasala caught by Pune Police)

हेही वाचा: बेरोजगारीनं त्रस्त तरुणाचा मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवलेश सूर्यकांत साळुंखे (वय २३, रा. संत रोहिदास नगर, खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गंभीर गुन्हांमध्ये फरार असलेला देवलेश साळुंखे हा खडकवासला येथील आपल्या घरी येणार असून, त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

हेही वाचा: दहावीचा निकाल लांबणीवर; आठवड्याभरानंतर लागण्याची शक्यता

माहिती मिळाल्यानंतर, सापळा रचून पोलिसांनी त्याला घरातून ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आणि खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. पुढील तपासासाठी आरोपीला हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

loading image